आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट सोने विकण्याचा प्रयत्न, दोन महिलांसह तिघे अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बनावट सोने विकणाऱ्या दोन महिलांसह एका भामट्याला गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास पकडले. पोपट नारायण पवार (३५), छाया पोपट पवार (२५), जिजाबाई तान्हाजी पवार (४०, रा. नवीन शिवराई, ता. गंगापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
बनावट सोन्याचे दागिने विकण्यासाठी तिघे जण ग्राहक शोधत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी बाबा पेट्रोल पंप चौकात सापळा रचला. महिला पोलिस शिपाई एस. एच. लोखंडे या ग्राहक म्हणून चौकातील एका हॉटेलजवळ उभ्या राहिल्या. या वेळी पोपट पवार बनावट सोने घेऊन आला. त्यांना देण्यासाठी पोलिसांनी वर आणि खाली खरी नोट आणि मध्ये कागद घालून नोटांचे बंडल तयार केले होते. लोखंडे यांनी सहकाऱ्यांना इशारा केला आणि भामटे जाळ्यात अडकले. पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे, अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलिस निरीक्षक गणेश कल्याणकर, शेख आरीफ, सुधाकर राठोड, सुनील पाटील, फकीरचंद फडे, भीमराव पवार, नंदलाल चव्हाण, लालखाँ पठाण, विकास माताडे या पथकाने ही कारवाई केली.