आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहायक फौजदाराला ठार मारण्याचा प्रयत्न; गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाहतूक शाखेचे कर्मचारी दौलताबाद टी पॉइंटवर वाहनांची तपासणी करत असताना कंटेनरचालकाने एका सहायक फौजदाराच्या अंगावर कंटेनर घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता कंटेनर रस्त्यावर सोडून चालक फरार झाला. जखमी सहायक फौजदारावर घाटीत उपचार करण्यात आले.

छावणी पोलिस ठाण्यातील वाहतूक शाखेचे सहायक फौजदार मिर्झा रहीम बेग ( ५०) सहका-यांसमवेत दौलताबाद टी पॉइंटवर दुपारी २ च्या सुमारास वाहनांची तपासणी करत होते. त्याचवेळी कंटेनर (क्रमांक एच आर ६१ ए ५९७७) भरधावपणे दौलताबादकडे जात होते. त्याचवेळी सहायक फौजदार बेग यांना धक्का देऊन कंटेनर न थांबता पुढे निघाले. बेग यांच्या उजव्या हाताला जोराचा मार लागला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांच्या पायाला, पाठीलाही जबर मार लागला. अशा परिस्थितीतही त्यांनी कंटेनरचा पाठलाग केला असता कंटेनर रस्त्यावर उभे करून चालक पसार झाला. मिर्झा यांना घाटीत दाखल करण्यात आले. दौलताबाद पोलिस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.