आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"देवगिरी'च्या मैदानावर मंगळवारी टिळा होळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळाशीलढणाऱ्या मराठवाड्यात लाखो लोक घोटभर पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. त्यांच्याविषयी संवेदनशीलता दाखवून पाण्याच्या बचतीची शपथ घेत ‘टिळा होळी’ खेळण्याचा अनोखा उपक्रम "दिव्य मराठी'तर्फे आयोजित करण्यात आला आहे. देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर २२ मार्च रोजी सकाळी १० वा. हा अागळावेगळा उपक्रम होणार आहे.
मराठवाडा सातत्याने दुष्काळाला सामोरा जात आहे. यंदा बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत भयावह स्थिती आहे. तेथे घोटभर पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन "दिव्य मराठी'ने टिळा होळी खेळण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे ठरवले आहे. यामध्ये दुष्काळाचा तडाखा सहन करणाऱ्यांविषयी संवेदनशीलता दाखवत पाण्याची बचत करण्याची शपथ घेतली जाणार आहे. त्यात शहरातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. गेला आठवडाभर यासाठी शपथपत्रांद्वारे जनजागृती करण्यात आली. त्यास सर्वस्तरातील नागरिक, मान्यवरांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. दुष्काळग्रस्तांविषयी संवेदनशीलता आणि पाणी बचतीचा संदेश या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असून त्यासाठी औरंगाबादकरांनी सकाळी १० ते ११ असा एक तास वेळ काढून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही मान्यवरांनी केले.

प्रत्येक जण होऊ शकतो उपक्रमात सहभागी
सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या टिळा होळी उपक्रमात कोणत्याही वयोगटातील नागरिक, विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, सरकारी-निमसरकारी, खासगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, कामगार, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते, नोकरदार महिला, शिक्षक, प्राध्यापक सहभागी होऊन पाणी बचतीची शपथ घेऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...