आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर: आधीच्या विरोधकांचा आता गळ्यात गळा, यापूर्वी तुपे होते सभागृह नेते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राजकारणात कुणीच परस्परांचे कायमस्वरूपी शत्रू नसते. कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात आरोपांची तोफ डागणारे आज एकत्र येऊ शकतात. एवढेच नव्हे, तर सत्तेतही सहभागी होतात. याचाच अनुभव बुधवारी मनपाच्या सभागृहात आला. २०११-१२ या वर्षात त्र्यंबक तुपे हे सभागृह नेते, तर प्रमोद राठोड हे विरोधी पक्षनेते होते. दोघांनी मनपा तसेच ६ महिन्यापूर्वीच्या विधानसभा निवडणूक प्रचारात परस्परांवर जोरदार टीका केली. त्यावेळी एकमेकांशी कडाडून भांडणारे हे दोघे साडेसात वर्षांचे महिलाराज (विजया रहाटकर, अनिता घोडेले, कला ओझा यांचा कार्यकाळ) संपल्यावर एकमेकांसोबत काम करणार आहेत.

बुधवारी दुपारी दोघांनीही आपापला पदभार स्वीकारला. पुढील आठवड्यापासून ते कामाला सुरुवात करतील, तेव्हा एकमेकांच्या शेजारी बसूनच त्यांना निर्णय घ्यावा लागेल. सभागृहातही दोघे शेजारीच असतील आणि शिष्टाचारातही एकानंतर दुसराच असेल. एक वर्ष एकमेकांच्या विरोधात काम केल्यानंतर आपण कधीकाळी एका झेंड्याखाली असू याचा विचार दोघांनीही कधी केला नसेल. पण राजकारणात काहीही होऊ शकते. त्याचा प्रत्यय या निमित्ताने आला असून आता या दोघांना झाले गेले सारे विसरून युतीचे शिलेदार म्हणून काम करावे लागणार आहे. यात तुपे हे अनुभवाने वरिष्ठ असून या वेळी ते चौथ्यांदा, तर राठोड दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत. राजकीय विरोधात असतानाही तुपेंशी माझे चांगले संबंध होते, असे राठोड यांनी सांिगतले, तर राठोड केवळ राजकीय विरोधक होते. आता त्यांना सोबत घेऊनच शहराचा विकास करणार असल्याचे तुपे म्हणाले.

महापौरांपेक्षा उपमहापौरांची संपत्ती जास्त
पुढील दीड वर्षासाठी औरंगाबाद शहराचा कारभार चालवण्याची जबाबदारी असलेले महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवताना त्यांच्या संपत्तीचा तपशील जाहीर केला होता. तो ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी देत आहोत.

प्रमोद राठोड
रोकड : * एसबीआय मुख्य शाखेत २३ हजार ५०० *एसबीएचमध्ये ७ हजार ७११
*आयडीबीआय उस्मानपुरा शाखेत १९ हजार ५७५ *सेव्हन हिल शाखेत १९ हजार ९५
*स्टेट बँक शाखेत १३ हजार ८० पत्नी भक्ती यांच्या खात्यात *एसबीआयमध्ये ३ लाख १२ हजार २०३ * एसबीएचमध्ये ३५०० *देवगिरी बँकेत एक हजार ६३८
भूखंड : *प्रमोद यांच्या नावावर चितेगाव येथे पाच एकर (किंमत सुमारे ३८ लाख) {नायगाव येथे पाच लाख रुपये किमतीची २ एकर शेती *शेंद्रा येथे २० गुंठ्यांचा भूखंड (५ लाख) *सिडको एमआयडीसीत २४ लाख १० हजार रुपये किमतीचा भूखंड
गाडी-बंगला : *चेतन ट्रेड सेंटर, सेंट फ्रान्सिस शाळेसमोर येथे ३ दुकाने *सिडको एन-३ येथे ३ हजार चौरस फुटांचा बंगला (सुमारे १ कोटी) *साडेतीन लाख रु.ची वॅगन आर कार *१२ लाख ५० हजार रुपयांचे टिप्पर *९ लाख ११ हजार ९८४ रुपयांची इनोव्हा
सोने-पॉलिसी : *८ लाख रुपयांचे सोने, दहा हजारांची चांदी. *वीरेंद्र, विराग या मुलांच्या नावाने एक लाख ५८ हजारांची पॉलिसी *प्रमोद यांच्या नावाने ४ लाख १२ हजार १४४ रुपयांची विमा, तर तीन लाख रुपयांची एसबीआयची पॉलिसी.

त्र्यंबक तुपे
रोकड : *दोन लाख रोख *पत्नी सविताच्या नावाने ३५ हजार रुपये.
भूखंड : *पीरबावडा (ता. फुलंब्री) येथे सहा लाख रुपये किमतीची ४ एकर २२ गुंठे जमीन. *म्हैसमाळ, चितेगाव येथे प्रत्येकी एक एकर, तर फुलंब्रीला २ एकर जमीन. (एकूण किंमत ८ लाख) *कुंभेफळ येथे सहा लाख रुपये किमतीची एक एकर जमीन. *बालाजीनगरात पत्नीच्या नावाने ७ लाख रुपयांची तीन दुकाने. *तीन लाख रुपये किमतीचे घर.
गाडी : *टाटा सफारी (एमएच २० बीएन ७१७१) *एनफिल्ड बुलेट (एमएच २० सीएन ७१७१)
सोने : *पत्नीच्या नावाने एक लाख ४० हजार रुपयांचे पाच तोळे सोने.
कर्ज : तुपे यांच्या नावावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ११ लाख रुपयांचे कर्ज असून त्यातील ९ लाख २० हजार रुपयांची फेड बाकी आहे.
पुढे वाचा... महापौर गायब... अन् पालकमंत्र्यांची शुगर वाढली