आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूरडाळ २० रुपयांनी स्वस्त, साठेबाजांवर कारवाईचा इशारा देताच दर घटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सरकारने साठेबाजांवर कारवाईचा इशारा देताच तूरडाळ स्वस्त झाली आहे. तीन दिवसांत औरंगाबादेत तूरडाळीचे दर १५ ते २० रुपयांनी घटले. दसरा-दिवाळीतही डाळींचे भाव स्थिर राहण्याचा अंदाज होलसेल व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने डाळी कडाडून १३० ते १८० रुपयांवर पोहोचल्या. २०१२ मध्ये तूर, मूग, उडीद आदी डाळी ५५ ते ६० रुपये किलो होत्या. गेल्या वर्षी २० लाख टन डाळींचे उत्पादन कमी झाले. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी तूरडाळ २०० रुपये, मूग १३०, हरभरा ७५, उडीद डाळ १६० रुपये किलो होती. परंतु, कडक कारवाईच्या आदेशाने साठेबाजांचे धाबे दणाणले. सोमवारी घाऊक बाजारात तूरडाळ १५० ते १७० रुपये, तर किरकोळ बाजारात १८० ते १८५ रुपये किलोने विकली. मूगडाळ ठोक बाजारात ११० ते १२० आणि किरकोळ बाजारात १३० ते १३५ रुपये होती.

साठ्यावर निर्बंध
राज्य सरकारने डाळी, खाद्यतेले व तेलबियांच्या साठवणुकीवर सप्टेंबर २०१६ पर्यंत निर्बंध लागू केले आहेत. त्याच्या अध्यादेशाला मंगळवारी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकते.