आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त तूर डाळीत आढळली लाखेच्या डाळीची भेसळ, तपासणीत समोर आले सत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तूरडाळीचे वाढलेले भाव सर्वसामान्यांना कमी किमतीची डाळ विकत घ्यायला भाग पाडत आहेत; मात्र, कमी किमतीच्या डाळीत आरोग्याला अत्यंत घातक ठरू शकणाऱ्या लाखेचे अंश आढळले असून ती डाळ सुरक्षित अन्न निकषांचा भंग करणारी आहे असा अहवाल विभागीय सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेने दिला आहे.

तुरीची डाळ सर्वसामान्यांना परवडेनाशी झाल्यापासून कमी किमतीच्या डाळीची मागणी वाढली आहे. कमी किमतीची (१०५ रुपये किलो) डाळ बाजारात उपलब्ध असताना वाढलेल्या किमतीचा डांगोरा का पिटला जातो आहे, असा प्रश्न पडला आणि त्यातूनच या डाळीची अचानक मागणी वाढली असल्याचेही समोर आले.

ही डाळ जर योग्य दर्जाची असेल तर डाळीची किंमतवाढ आणि त्यावरची टीकाही निरर्थक ठरू शकते, हे लक्षात घेऊन ‘दिव्य मराठी’ने या कमी किमतीच्या आणि अन्य दर्जाच्या डाळींचीही तपासणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून धक्कादायक सत्य समोर आले आहे.

हे आहेत निकष
तुरीचीडाळ योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यातील आर्द्रता (जी बुरशीला कारणीभूत ठरू शकते),बाह्य पदार्थ, इतर खाण्यायोग्य दाणे, हानी पोहोचलेले दाणे, कीड लागलेले दाणे, कृत्रिम रंग, युरिक आम्ल आणि अल्फाटाॅक्झिन यांचे प्रमाण तपासले जाते. "दिव्य मराठी'ने तपासलेल्या या डाळींमध्ये ही सर्व मानके नियंत्रणात असल्याचे आढळून आले. मात्र तुकडा डाळीत लाखेचे दाणे असल्याचा ‘पाॅझिटिव्ह’ अहवाल देण्यात आला. शिवाय याच डाळीत अन्य खाद्य दाणेही मिसळलेले आढळून आले आहेत.

होऊशकतो अर्धांगवायू
तुरीच्याडाळीत लाखेचे दाणे मिसळले जातात. ते तूरडाळीसारखेच िदसत असल्यामुळे (थोडे भडक रंगाचे) डाळीत भेसळ केली तरी सहज लक्षात येत नाही. मात्र, त्यांच्या सेवनाने अर्धंागवायू (पॅरालिसिस) होण्याचा धोका वाढतो आणि कमरेपासून पाय लुळे पडण्यासारखे आजार होऊ शकतात, असे आहारतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

फसवणूक आिण आरोग्याशी खेळ
तुकडा डाळीमध्ये लाखेसोबतच मूग, मठ या कमी किमतीच्या डाळींचीही भेसळ करण्यात येते. ही ग्राहक म्हणून आपली फसवणूक आहे. शिवाय लाखेमुळे शरीरावर गंभीर परिणाम होतात. अर्धांगवायूचा झटका येणे किंवा कमरेपासून पाय लुळे पडणे असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे तुरीची डाळ निवडताना आपण अनारोग्य तर निवडत नाही ना, याचाही विचार करायला हवा. -डॉ.अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ
त्यात बजरंगी फटका (१८९ रुपये किलो), शबरी कोरी(१५९ रुपये किलो) आणि तुकडा (१०५ रुपये किलो) या डाळींचा समावेश होता.

तुकडा डाळीत लाखेचे दाणे आढळून आले असून ही डाळ सुरक्षित अन्न निकषांचा भंग करीत असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

आवश्यक त्या तपासण्या पूर्ण केल्यानंतर प्रयोगशाळेने तपासणीचे निष्कर्ष सांगणारा अहवाल दिला आहे.

‘दिव्य मराठी’ने वेगवेगळ्या किमतीच्या तीन प्रकारच्या तूर डाळ विकत घेऊन शासकीय आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्या होत्या.