आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Turbid Water Thrown On The Parallel Of Engineers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समांतरच्या अभियंत्यावर गढूळ पाणी फेकले, संजयनगरातील घटना, तक्रार निवारण होत नसल्याने नागरिक भडकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिन्सीवॉर्ड क्रमांक ५६ मधील संजयनगरच्या गल्ली नंबर दोनमध्ये गेल्या महिन्यापासून ड्रेनेजमिश्रित पाणी येत होते. वारंवार अधिकाऱ्यांना सांगूनही ही समस्या सुटत नसल्याने सुमारे दोनशे ते अडीचशे नागरिकांनी समांतरचे अभियंता व्ही. स्वामी यांना धक्काबुक्की करून त्यांच्या अंगावर ड्रेनेजचे पाणी टाकले. ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
संजयनगर भागात नवीन मोठी ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. जुनी पाइप ड्रेनेजलाइन सोबतच टाकल्याने काही ठिकाणी पाण्याची लाइन फुटली आहे. त्यामुळे ड्रेनेज लाइनचे पाणी पिण्याच्या पाइपलाइनमध्ये जात आहे. त्यामुळे महिन्यापासून ड्रेनेजमिश्रित पाणी येत अाहे. हे पाणी पिण्यायोग्य नव्हते. त्याबाबत उर्वरितपान
संजयनगर येथील नागरिकांनी समांतरचे अभियंता स्वामी यांना असे फरपटत ओढत नेऊन वॉर्डातील पाणीसमस्येचा पाढा वाचला.

पाणी समस्येवरून नागरिकांनी मनपाच्या वॉर्डाला टाळे ठोकले होते. त्यावर काम सुरू असेपर्यंत टँकर देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र आठ दिवसांत कोणतेच काम केल्याने आजचा प्रकार घडला.

अधिकारी, नगरसेवकांना बिसलरी
^हे अधिकारी पाहणी करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्यासोबत बिसलरीचे पाणी होते. नगरसेवकही हेच पाणी पितात. आम्हाला मात्र ड्रेनेजचे पाणी प्यावे लागते. सविता घुगरे, रहिवासी,संजयनगर

...तरमनपाविरुद्ध याचिका
^नागरिकांना चांगले पाणी पुरवण्याची जबाबदारी मनपाची आहे. ते पाणी फुकट देत नसून त्या मोबदल्यात पैसे घेतात. तरीही चांगले पाणी देत नाहीत. यानंतर चांगले पाणी आल्यास मनपाविरुद्ध थेट न्यायालयात याचिका दाखल करणार. राजू ठाकरे, रहिवासी,संजयनगर