आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाविद्यालयांतर्गत परीक्षेत रोल नंबर चुकल्याने तणावाखाली आलेल्या १२ वीच्या विद्यार्थिनीने मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रियंका सुभाष काळे (रा. चिकलठाणा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. शिवछत्रपती महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या प्रियंकाची आई मोठी बहीण मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास किराणा सामान आणण्यासाठी बाहेर गेले होते. वडील समोरच्या खोलीत टी.व्ही. पाहत बसले होते. आई बहीण परतल्यानंतर त्यांनी प्रियंकाला आवाज दिला. मात्र, प्रतिसाद दिल्याने दरवाजा तोडला. प्रियंकाने दोरीच्या साहाय्याने फॅनला गळफास घेतल्याचे दिसले. तिला घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शेख अर्शद पुढील तपास करत आहेत.

प्रियंकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपासून होणाऱ्या अंतर्गत परीक्षेच्या प्रवेश पत्रावर प्रियंकाचा रोलनंबर चुकला होता. परीक्षेला मुकावे लागेल, या भीतीने ती तणावाखाली होती. दरम्यान, पोलिसांना दिलेल्या जबाबात कुटुंबीयांनी असा कुठलाही उल्लेख केला नाही, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवेश पत्र देतच नाही
युनिटपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तोंडी किंवा नोटीस बोर्डवर रोल नंबर दिला जातो. ती महिनाभरापासून महाविद्यालयात आलीच नाही, असे स्पष्टीकरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. अष्टेकर यांनी दिले.
बातम्या आणखी आहेत...