आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Two Accused Two Years Rigorous Imprisonment Issue At Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विनयभंगप्रकरणी दोन आरोपींना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अल्पवयीनमुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन आरोपींना जिल्हा सत्र न्यायाधीश अशोक सोनी यांनी दोन वर्षांची सक्तमजुरी आणि हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संतोष ज्ञानेश्वर दराडे (२२) आणि दिगंबर उत्तम दराडे (२०) अशी आरोपींची नावे आहेत.
२८ मार्च २००९ रोजी अल्पवयीन मुलीचे आई-वडील गावी गेले असता तिचा विनयभंग केला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर मुलीची आजी तसेच शेजारील लोक आल्यानंतर दोन्ही आरोपींनी पळ काढला. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात एकूण साक्षीदार तपासण्यात आले. कलम ४५२ अन्वये दोन्ही आरोपींना वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी हजार रुपये दंड तर ३५४ अन्वये महिने सक्तमजुरी आणि १००० दंड तसेच ३४२ अन्वये महिने सक्तमजुरी आणि ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. व्ही. एन. चौकीदार यांनी काम पाहिले.