आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत खंडणीबहाद्दरांकडून सात लाखांचा ऐवज जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- काळ्या जादूची भीती दाखवून मित्रांचीच फसवणूक करत 16 लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या दोन भामट्यांकडून पोलिसांनी सात लाखांचा ऐवज जप्त केला. खंडणीच्या पैशातून खरेदी केलेली स्विफ्ट कार, सोने आणि टीव्हीसह दीड लाख रुपये हस्तगत करण्यात आले. दोघांची 13 डिसेंबरपर्यंत हसरूल कारागृहात रवानगी केल्याचे उपनिरीक्षक राहुल फुला यांनी सांगितले.
श्रीनिवास अडसूमल्ली (20) या युवकाला सिक्युरिटी अँड हाउसकिपिंग व्यवसायात भागीदार करून घेण्याचे आमिष देऊन समिउल्ला जफर मिर्झा (27) आणि सिद्दिकी हसन मुशाहेद ऊर्फ मुजाहेद सिद्दिकी (29) या दोन आरोपींनी 16 लाख 20 हजार रुपये उकळले. सुरुवातीला व्यवसायाच्या नावाखाली तर त्यानंतर काळ्या जादूची भीती दाखवून तीन टप्प्यांमध्ये त्यांनी सर्व रक्कम वसूल केली. परिमंडळ-1 चे पोलिस उपायुक्त डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक राहुल फुला यांनी 22 नोव्हेंबर रोजी हा गुन्हा उघडकीस आणला. बसस्थानक परिसरात सापळा रचून त्यांनी दोन्ही भामट्यांना ताब्यात घेतले. 1 डिसेंबरपर्यंत त्यांना पोलिस कोठडीत ठेवले होते. 16 लाखांच्या रकमेतून आरोपींनी स्विफ्ट कार, 82 हजारांचे सोने, 22 हजार रुपये किमतीचा सॅन्सुई कंपनीचा एलसीडी टीव्ही खरेदी केली होता. पोलिसांनी दीड लाख रुपयांची रोकड दोन हजारांचे प्रत्येकी दोन मोबाइल, पल्सर दुचाकीही जप्त केली.