आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटार लावण्यास गेलेले दोघे भाऊ मृत्युमुखी, एकाचा नूकताच झाला होता विवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बबलू पाटील (२८) व बाळा नाना पाटील (३०) - Divya Marathi
बबलू पाटील (२८) व बाळा नाना पाटील (३०)
नागद  - प्रकल्पात मोटार टाकण्यासाठी गेलेला भाऊ पाण्यात बुडत असल्याचे पाहताच त्याला वाचवण्यासाठी गेलेल्यासह दोघा भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नागद येथील गडदगड प्रकल्पा जवळ घडली. बबलू पाटील (२८) व बाळा नाना पाटील (३०) असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणामुळेच दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी आरोग्य केंद्रास दुपारी टाळे ठोकले.   शनिवारी सकाळी पाटील बंधू पाणी पुढे सरकल्याने मोटार पुढे प्रकल्पात टाकण्यासाठी दोघांपैकी एक जण उतरला होता. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला हे पाहताच दुसऱ्याने पाण्यात त्याला वाचण्यासाठी हात पुढे केला. तेव्हा दोघेही गाळात रुतले. बराच वेळ ते वर न आल्याने शेतकऱ्यांनी पाहिले व आरडाओरड केली. तेव्हा दोघांना बाहेर काढले. 
 
असा लागला घटनेचा छडा
निलेश पाटील व योगेश पाटील हे मोटार काढण्यासाठी गेले असताना त्यांनी काठावर कपडे काढले होते. बाहेर पडलेले कपडे व चपला पाहून काही गावकऱ्यांनी खड्ड्यात डोकावून पाहीले असता हा प्रकार लक्षात आला. या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी दोघांना बाहेर काढून डॉक्टरांकडे नेले असता दोघेही मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शहरातील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे गावावर मोठी शोककळा पसरली होती.
बातम्या आणखी आहेत...