आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Brothers Got Dead After Fall In Well, Divya Marathi

सारोळ्यात दोन भावांचा विहिरीत बुडून मृत्यू, विहिरीत डोकावत असताना घडला प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा - दोन चिमुकल्या भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना सारोळा येथे शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. स्वातंत्र्यदिनी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथील शेतकरी कैलास दराडे हे ध्वजारोहण संपल्यानंतर वैभव दराडे (3 वर्षे) तसेच किरण दराडे (७ वर्षे) या मुलांना शेतात घेऊन गेले. झाडाला झोका बांधून वैभवला त्यात टाकून काम करत होते. वैभव रडत असल्याने किरणने त्याला आई-वडील काम करत असलेल्या ठिकाणी नेत

असताना शेजारील विहिरीत डोकावत असताना किरणचा तोल गेला. यात दोघेही विहिरीत पडले. यातच वैभव व किरणचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेची मािहती सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे, फौजदार अनंत जगताप, पोलिस हेडकॉन्स्टेबल बी. एस. सोनवणे, सुनील भिवसने यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. यानंतर सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह पालकांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी अजिंठा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.