आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन कारच्या धडकेत चार जण गंभीर जखमी, घाटी रुग्णालयात उपचार सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- समोरून आलेल्या भरधाव टोयोटा फॉर्च्युनर कारवर ह्युंदाई व्हर्ना कार आदळून चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात तिसगाव चौफुलीवर बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास झाला. अनिता संतोष पिपाडा (४७), मनीषा संदीप बोहरा (३७), संतोष छगनमल पिंपाडा (४८), संजय रमेशमल शर्मा (४८, रा. सर्व अहमदनगर) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास लासूर स्टेशनकडून ह्युंदाई व्हर्ना कार (एमएच १७ एझेड ७१५५) औरंगाबादकडे येत होती. तर टोयोटा फॉर्च्युनर कार (एमएच २० सीजी ७७७०) तिसगावकडे जात होती. समोरून भरधाव आलेली व्हर्ना कार फॉर्च्युनर कारवर धडकली. त्यामुळे फॉर्च्युनर कार सहा ते सात वेळा उलटून लगतच्या हॉटेलच्या भिंतीवर धडकली. यात चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी उपचारांसाठी घाटीत दाखल केले. अपघाताची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...