आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिलांचा खून; एकीचा डोक्यात मुसळ घालून, तर दुसरीचा गळा चिरून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहर आणि परिसरात सोमवारी दोन महिलांच्या खुनाच्या घटना घडल्या. पहिली घटना नारेगावातील आनंद गाडे नगरात घडली. या घटनेत वीस वर्षांच्या मुलाला घरातील एका खोलीत कोंडून दुसऱ्या खोलीत पत्नीच्या डोक्यात मुसळ घालून तिचा खून करून पती पसार झाला. मुमताज मोहन तामचीकर (४०, रा. चमचमनगर, नारेगाव) असे मृत महिलेचे तर मोहन ऊर्फ बिच्छू तामचीकर (४४) असे आरोपीचे नाव आहे. दुसरी घटना कागजीपुरा येथील जंगलात घडली. तेथे एका महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला. या महिलेची ओळख अद्याप पटली नाही. 
 
घटना क्र. 1
दौलताबाद गावाजवळील माळीवाडा शिवारातील कागजीपुरा जंगलात ३५ ते ४० वर्षीय महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी रात्री संध्याकाळी सहाच्या सुमारास आढळला. भुरकट आणि पांढरी सलवार परिधान के ली आहे. तिच्या डाव्या हातात सोन्याची अंगठी आणि दोन्ही पायात पैंजण आहेत. मृतदेह आढळल्या ठिकाणापासून १५ ते २० मीटवरील बाभळीच्या झाडाखाली या महिलेच्या चप्पल सापडल्या. या झाडापासून ते मृतदेह सापडल्या ठिकाणापर्यंत रक्ताचे डाग आढळून आले आहेत. त्यामुळे झाडाखालीच या महिलेचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट होते. सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास तिचा मृतदेह वन विभागाने खोदलेल्या नालीत एका गुरख्याला दिसला. त्याने ही माहिती कागजीपुऱ्याचे सरपंच शेख अहेमद शेख शरिफोद्दीन यांना दिली. पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, सहाय्यक आयुक्त नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, उपनिरीक्षक संजय मांटे, दिनेश सूर्यवंशी, राजेश पोहनकर, विक्रम वढणे, वर्षा शिराळ यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. 

दोन दिवस पडून होता मृतदेह...
महिलेचा खून दोन दिवसांपूर्वी झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या मृतदेहाजवळ ओळख पटावी अशी कुठलीही वस्तू पोलिसांना सापडली नाही. सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत पोलिस घटनास्थळावर पुरावा शोधत होते. 
 
पुढील स्लाइडवर वाचा दुसरी घटना, महिलेचा मुसळ घालून महिलेचा मृत्यू...
बातम्या आणखी आहेत...