आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवना नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - वैजापूर तालुक्यातील लासूरगावात शिवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मूत्यू झाल्याची घटना सोमवार दि. २७ रोजी दुपारी घडली. वाळूतस्करांनी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर भले मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांचा अंदाज आल्याने मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बुडून मृत्युमुखी पडलेल्यांत गौरव राजू वाघ वय १३, प्रेम संतोष जैस्वाल वय १३ दोघे रा. लासूर स्टेशन यांचा समावेश आहे. दोघांचे मृतदेह लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथील दोन्ही वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. गौरव आणि प्रेम हे दुपारी शिवना नदीवर पोहण्यासाठी गेले होते. या नदीपात्रात वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केल्यामुळे मोठे खड्डे पडले आहेत. ते खड्डे काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे झाकले गेल्याने पोहण्यासाठी या दोन अल्पवयीन मुलांना खड्ड्याचा अंदाज आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. महसूल पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शिवना नदीपात्रात वाळूतस्करांनी अवैध वाळूचा उपसा केल्याने नदीपात्रात झालेल्या खड्ड्याने या अल्पवयीन मुलांचा बळी घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
नदीत बुडून सोळावर्षीय मुलाचा अंत
प्रतिनिधी | ढोरकीन
शेळ्याचारण्यासाठी मित्रांसमवेत गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ढोरकीन (ता. पैठण) येथे घडली. गौरव चंद्रकांत खुणे (१६, रा. ढोरकीन, ता. पैठण) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवार, २७ जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान गौरव खुणे हा ढोरकीन ते टाकळीच्या मध्ये असलेल्या ओढ्याच्या कडेला शेळ्यांना खाण्यासाठी झाडाचा पाला तोडत होता. त्या वेळी पाय घसरून तो खाली असलेल्या डोहात पडला. डोहात खोलवर गाळ असल्याने तो गाळात फसला गेला. वेळेवर मदत मिळाल्याने त्याचा पाण्यातच बुडून मृत्यू झाला. माहिती मिळताच घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यास पाण्यातून बाहेर काढले तत्काळ दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
या घटनेची पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जाधव करीत आहेत. या घटनेमुळे ढोरकीन परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पार्थिवावर ढोरकीनच्या स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...