आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातेसह देान मुलांचे मृतदेह आरापूरच्या विहिरीत आढळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - नागपूर-मुंबई महामार्गावरील आरापूर शिवारातील विहिरीत २५ वर्षीय महिलेचा दोन मुलांसह मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी दुपारी पाच वाजेदरम्यान उघडकीस आली. घटनेमागचे नेमके कारण कळू शकले नाही. स्वाती राहुल रणयेवले (२५),अनुष्का राहुल रणयेवले (४), राज राहुल रणयेवले (अडीच वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तिघेही धामोरी येथील रहिवासी होते.
ही घटना नागपूर-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील आरापूर शिवारातील गट नं. ४९ मधील शेतात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, पाच वाजेदरम्यान पोलिस पाटील सुधाकर रणयेवले यांनी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे, अशोक गंगावणे, दादाराव पवार, विठ्ठल राख, हरी नरके, वाघुळे हे पथक घटनास्थळी पोहोचले. त्या वेळी विहिरीत पाहणी केली असता पाण्यावर मुलाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. आई व बहीण दिसत नसल्याने गळ टाकून बघितले तर दोन मृतदेह आढळून आले.
बातम्या आणखी आहेत...