औरंगाबाद - मालमत्ताकराच्या बड्या थकबाकीदारांना जून रोजी पोलिस आयुक्तालयात बोलावण्यावरून मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केला आहे. बकोरियांनी माफी मागावी, असा धोशा नगरसेवकांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत लावला. मात्र, बकोरियांनी तो साफ धुडकावून लावला. दुसरीकडे शिवसेना शांत असल्यामुळे शहर शांत आहे, या खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याला अमितेशकुमार यांनी 'असे कुणी म्हणत असेल तर तो त्याचा गैरसमज आहे,' अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले.
पुढे वाचा...
> आपल्यामुळेच शहरात शांती हा भ्रम काढून टाका : अमितेशकुमार
> ठरावाचे पालन करीन; पण ना माफी ना दिलगिरी : बकोरिया