आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डीएमआयसीसाठी दोन कंपन्यांशी केला करार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेंद्रा-बिडकीनमधील‘डीएमआयसी’ प्रकल्पासाठी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दोन कंपन्यांनी सामंजस्य करार करण्यात आला. हयात हॉटेल आणि प्रीमियम ट्रान्समिशन या दोन कंपन्यांनी मंगळवारी राज्य शासनाशी सामंजस्य करार केला असून दोन्ही कंपन्यांच्या एकूण ११५ कोटींच्या गुंतवणुकीतून ३५० जणांना रोजगार मिळणार आहे.
दोन्ही सामंजस्य करारांवर मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्वाक्षरी करण्यात आली. राज्य शासनाच्या वतीने प्रधान सचिव विजय सिंघल यांनी, तर संबंधित कंपन्यांच्या वतीने विक्रम शर्मा आणि शंतनू मेडी यांनी करारावर स्वाक्षरी केली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री रामदास कदम, परभणी-नांदेडचे पालकमंत्री दिवाकर रावते, बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, जालनाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, कामगार कल्याण आणि कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्ध विकास मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसेच राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

तारांकित हॉटेल उभारणार : हयातहॉटेल शेंद्रा येथे तारांकित हॉटेल उभारण्यास उत्सुक असून साडेपाच एकर जागेवर त्याची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी ६५ कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून सुमारे २०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. प्रीमियम ट्रान्समिशन ही कंपनी १९६१ पासून उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे. निर्यातक्षम उत्पादन करणाऱ्या या कंपनीने शेंद्रा-बिडकीन येथे ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली असून त्यामुळे १५० लोकांना रोजगार मिळू शकेल.

बातम्या आणखी आहेत...