आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बनवाबनवी: 'एसबीआय'च्या पार्किंग खात्यात 2 कोटींचा घोटाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एसबीआयच्या पार्किंग खात्यात जमा होणारी कोट्यवधींची रक्कम दहा बनावट खात्यांत आणि सहा जवळच्या लोकांच्या खात्यात जमा करून नंतर ती स्वत:च्या खात्यामध्ये वळती करून बँकेची सहायक व्यवस्थापक स्नेहल अंबरनाथ पवार-जाधव हिने सुमारे दोन कोटींचा अपहार केला. या प्रकरणी तिच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना रोडवरील दूध डेअरी चौकातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत स्नेहल पवार (रा. निशांत रेसिडेन्सी, वसुंधरा कॉलनी, नंदनवन कॉलनी) ही सहायक प्रबंधक या पदावर २०१२ पासून कार्यरत होती. या शाखेत सप्टेंबर २०१५ रोजी नंदकिशोर रामविलास मालू (५८, रा. बी-५, प्राइड प्लाझा, वेदांतनगर) हे सहायक महाव्यवस्थापक म्हणून रुजू झाले. त्यांनी दैनंदिन कामकाज सुरू करत बँकेच्या सर्व खात्यांची तपासणी केली असता बँकेचे पार्किंग खाते क्र. ३१६७८८६६६८२ मधील बरीच रक्कम वळती करण्यात आल्याचे दिसून आले. या खात्यावरील रकमेच्या व्यवहारात बरीच विसंगती असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सहायक प्रबंधक स्नेहल पवार यांच्याकडे पार्किंग खात्याबाबत चौकशी केली. तसेच सर्व व्यवहार तपासले असता बँकेच्या पार्किंग खात्यात जमा होणारा दंड, व्याज कमिशनची रक्कम कर्जदाराच्या खात्यात जमा केल्याचे तसेच स्वत: पवार हिने आपले निकटवर्तीय आणि नातेवाइकांच्या नावे वेगवेगळी बनावट खाती उघडून पार्किंग खात्यातील रक्कम या बनावट खात्यांत आणि निकटवर्तीयांच्या खात्यांत जमा करून कोटी ९८ लाख २२ हजार ९२९ रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले.

आर्थिक गुन्हे शाखेने केला तपास
दरम्यान,स्नेहल पवार हिने बँकेच्या पार्किंग खात्यात अफरातफर करून रक्कम काढल्याचे उघडकीस आल्यानंतर तिचे पती विनोद पवार यांनी बँकेत १४ जानेवारी २०१६ रोजी ११ लाख ४४ हजार रुपये जमा केले. मात्र, उर्वरित रक्कम जमा होत नसल्याचे पाहून सहायक महाप्रबंधक नंदकिशोर मालू यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, जमादार विलास कुलकर्णी, विठ्ठल फरताळे, दत्तू गायकवाड, पोलिस नाईक प्रकाश काळे, भागवत सुरवाडे, मनोज उइके, शिपाई भीमराज जिवडे, महेश उगले, सचिन संकपाळ, दादासाहेब झारगड आणि जयश्री फुके यांनी या गुन्ह्याचा तपास करत भक्कम पुरावे गोळा केले. सहायक महाप्रबंधक मालू यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास क्रांती चौक पोलिस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक हेमंत कदम करत आहेत.
पुढे पाहा यांच्या नावे बनवली बनावट खाती
बातम्या आणखी आहेत...