आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Daughter Of Law Recovered From Surat, Police Action

पळून गेलेल्या जावांना सुरतहून परत आणले,पोलिसांची कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संजयनगर येथून पळालेल्या अनिता राहुल नवगिरे (32) आणि वंदना संतोष नवगिरे या दोन सख्ख्या जावांना मुकुंदवाडी पोलिसांनी रविवारी (1 डिसेंबर) सुरत येथून आणले. पहाटे पाच वाजताच दोन्ही जावांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. नव-यांच्या छळाला कंटाळून आपण पळाल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
मुलांना दिवाळीनिमित्त कपडे खरेदी करण्यासाठी जात असल्याचे सांगून 28 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता घराबाहेर पडलेल्या दोन्ही जावांना मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांनी 29 नोव्हेंबर रोजी सुरत येथे ताब्यात घेतले. दोन्ही जावांच्या मोबाइलचे ‘सीडीआर’ गुजरात येथे दाखवत असल्याचे गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात आणि चव्हाण यांच्या लक्षात आले. पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या परवानगीने चव्हाण 28 नोव्हेंबरला सुरत येथे गेले.
सलाबदपूर पोलिस ठाण्यातील कर्मचा-यांच्या मदतीने त्यांनी दोन्ही जावांचा शोध घेतला. सुरत येथून आलेल त्यांना फोन आला. तो फोन उमरवाडा या झोपडपट्टीतून आल्याचे स्पष्ट झाले. उमरवाडा येथील वडापाव विक्री करणा-याने दोन्ही जावांना एक किरायाची खोली करून दिली होती. त्याच्या मदतीने चव्हाण यांनी दोन्ही जावांना ताब्यात घेतले. पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलिस आयुक्त विजय पवार, मुकुंदवाडी ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयकुमार चक्रे, महिला कर्मचारी लता जाधव लक्ष्मण ंिनंबोरे यांनी ही कारवाई केली.