आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two day Workshop In Aurangabad, Criminal And Cyber Security,

इंटरनेटच्या वापरासंदर्भात जागरूकता हवी : राजेंद्र सिंह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वाढणारे सायबर क्राइमचे प्रकार कमी होण्यासाठी इंटरनेट वापराविषयी जागरूकता आवश्यक आहे. एटीएम कार्डचा नंबर विचारून होणारे फसवणुकीचे प्रकार, सोशल नेटवर्किंग साइटवर होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी नागरिकांनी जागरूक होणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात यावे, असे मत पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
सिडको एमआयटी महाविद्यालयातर्फे बीड बायपास येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी सायबर सुरक्षा आणि गुन्हे या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. पोलिस आयुक्त सिंह म्हणाले, दिवसेंदिवस इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगचे प्रमाण वाढत असल्याने सायबर क्राइमचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत: जागरूक होऊन आपली सुरक्षा केली पाहिजे. या वेळी एमआयटीचे महासंचालक मुनीश शर्मा, सायबर सेल मुंबईचे प्रमुख मल्लिकार्जुन मल्ले, प्राचार्या डॉ. मुक्ती जाधव, डॉ. संतोष भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. मुनीश शर्मा म्हणाले, इंटरनेटच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर क्रांती झाली आहे. काही वर्षांपूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सुविधेमुळे सहज शक्य झाल्या आहेत. या बदलत्या शाखेचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करायला हवा. यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी आहेत. त्या दृष्टीनेदेखील या शाखेकडे पाहायला हरकत नाही, असेही शर्मा यांनी सांगितले. याप्रसंगी शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याचा एक अधिकारी असे १५ अधिकाऱ्यांनीदेखील कार्यशाळेत सहभाग घेऊन प्रशिक्षण घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. भास्कर कदम, शंतनू व्यवहारे यांनी परिश्रम घेतले, तर रंजय काळे यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा काळे यांनी आभार मानले.