आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांच्या तान्हुलीला पावसात टाकून आई फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अवघ्या दोन दिवसांच्या तान्हुलीला भरपावसात रस्त्याच्या कडेला टाकून जन्मदात्री फरार झाली. घाटी रुग्णालयाच्या ओपीडी विभागासमोर ऑगस्ट राेेजी सायंकाळी ७.३० वाजता दोन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळून अाले. उपस्थितांनी तत्काळ अर्भक डॉक्टरांकडे सुपूर्द केल्याने उपचार सुरू होऊन बाळाचे प्राण वाचवण्यात यश आले. मागील दोन महिन्यांतील स्त्री जातीचे अर्भक टाकल्याची ही तिसरी घटना आहे.
शनिवारी शहरात रिमझिम पाऊस सुरू होेता. घाटीतील दिवसभराची गर्दी ओसरल्यावर अंधाराचा फायदा घेत एका महिलेने दोन दिवसांच्या अर्भकाला ओपीडीसमोर ठेवून पोबारा केला. काही नागरिक येथून जात असताना त्यांच्या नजरेस अर्भक पडले. डॉक्टर पोलिसांना माहिती दिल्यानंतर अर्भकाला घाटीतील वॉर्ड क्रमांक २४ मध्ये दाखल करून उपचार करण्यात आले. बाळाची तब्येत आता स्थिर असून उपचार सुरू आहेत. पोलिस नाईक सुनील राऊत यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्हीत महिला कैद?
ओपीडी विभागासमोर सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. घाटीतच प्रसूती झालेल्या महिलेने हे अर्भक टाकल्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेज हाती आल्यानंतर तपास करून त्या महिलेचा शोध घेण्यात येईल, असे बेगमपुरा ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आर. एम. बांगर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...