आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोच्या धडकेने पिता-पुत्र ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड- भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोखाली पिता-पुत्र जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी करमाड येथे घडली. या दुर्दैवी घटनेमुळे करमाड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
घटनेची माहिती अशी की, आडगाव, ता. औरंगाबाद येथील प्रकाश नारायण देशपांडे (५०) शुभम प्रकाश देशपांडे (१८) हे कामानिमित्त करमाड येथील ग्रामीण रुग्णालयात आले होते. काम संपल्यानंतर देशपांडे पिता-पुत्र सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच-२०-जी-१३५६) वर बसून गावाकडे जाण्यासाठी निघाले. त्यांची दुचाकी रस्त्यावर येताच औरंगाबादहून जालन्याकडे जाणाऱ्या आयशर ट्रक (एमएच-२०-डीई-१११६) ने जोराची धडक दिली. या बसलेल्या जबरदस्त धडकेने देशपांडे पिता-पुत्र जागीच ठार झाले. उपचारार्थ त्यांनी औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. 
बातम्या आणखी आहेत...