आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुचाकीवरील तिघांना ट्रकची धडक; दोन ठार, तर एक जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दुचाकीवरून बीड बायपासने रेल्वेस्टेशनकडे जाणार्‍या तिघांना पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिली. यात शेख जाकेर शेख मोहंमद (22), शेख अतिक शेख मुख्तार (22, इंदिरानगर, गारखेडा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर शेख सलमान शेख अय्युब (20) हा जखमी झाला. हा अपघात बुधवारी रात्री साडेदहा वाजता घडला.

तिघे दुचाकीवरून (एमएच 20 बीएम 7587) जात होते. रॉयल मोटर्ससमोर ट्रकने (पीबी 46 के 1447) त्यांना धडक दिली. शेख जाकेर व शेख अतिक यांच्या डोक्यावरून, तर शेख सलमानच्या दोन्ही पायांवरून ट्रकची चाके गेली. ट्रकचालकास छावणीत पकडण्यात आले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.