आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायपासवरील दोन डिव्हायडर उघडले : चार ठिकाणी ओपनिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वाढतेअपघात जड वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे बीड बायपासवर बंद करण्यात आलेले दुभाजक नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे काही ठिकाणी उघडले जाणार आहेत. शनिवारी वर्ल्ड बँकेच्या जागतिक प्रकल्प विभागातर्फे यापैकी पहिल्या दोन ठिकाणी दुभाजक फोडण्यात आले.
एक महिन्यापूर्वी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशानुसार एमएसआरडीसीच्या नियमानुसार बीड बायपासवर केवळ आठच वळणे ठेवण्यात आली. यासंदर्भात ३० जूनच्या अंकात वृत्त प्रसिद्ध् केले होते. रस्ता दुभाजक बंद केल्यामुळे नागरिकांची तारांबळ होत होती. अनेक ठिकाणी एक ते दोन किलाेमीटर जाऊन वळण घ्यावे लागत आहे. यासंदर्भात सातारा-देवळाईच्या नागरिकांनी अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी वर्ल्ड बँक प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती. बैठकीत दोन ठिकाणी वळण देण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले. त्यानुसार शनिवारी हॉटेल मिनाजसमोर कासलीवाल मार्व्हलजवळ वळण करण्यात आले. येत्या काही दिवसांत अजून दोन वळणे होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. शनिवारी अमितेशकुमार यांच्या आदेशानुसार उपअभियंता अनिल बेंद्रे शाखा अभियंता सुनील कोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार एमएसआरडीसीच्या नियमानुसार बीड बायपास रोडवर केवळ आठच वळणे ठेवण्यात आली होती. यासंदर्भात ३० जूनच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते.

सर्व्हिस रोड होणार
दुभाजकबंद केल्यामुळे सर्व्हिस रोड देण्याची मागणी नागरिकांकडून होत होती, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व्हिस रोडसंदर्भात एमएसआरडीसीने पहिलेच टेंडर काढले होते. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे तो होऊ शकला नाही. सर्व्हिस रोडसाठी जागाही उपलब्ध आहे. जवळपास सात ते आठ मोठ्या मालमत्ता वगळता फार अडचण येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर लगेच सर्व्हिस रोडचेही काम सुरू होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...