आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेतील नोकरीसाठी आता दोन परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करू पाहणाऱ्यांना आता दोन परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. आयबीपीएसने परीक्षा पद्धतीत बदल केला आहे.

अधिक गुणवत्तापूर्ण उमेदवारांची निवड करण्याच्या उद्देशाने नव्या वर्षात पूर्व परीक्षा आणि दुसरी मुख्य परीक्षा अशी दोन सत्रे असणार आहेत. त्यानंतर अंतिम मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना बोलावले जाईल. पूर्व परीक्षेतील गुण मेरिट लिस्टमध्ये गणले जाणार नाहीत. मुख्य परीक्षेतील गुणांवरच मुलाखतीला बोलावले जाईल. आयबीपीएसने २०१५ पासून होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रकही संकेतस्थळावर जाहीर केले आहे. हा बदल ऑक्टोबरपासून अमलात येईल.
असाकरता येईल सराव : आयबीपीएसनेउमेदवारांना सरावासाठी ऑनलाइन मॉक टेस्टची सुविधा संकेतस्थळावर दिली आहे. यामुळे परीक्षेचा पॅटर्न समजून घेण्यासाठी मदत होईल.

असेआहे परीक्षेचे नवे वेळापत्रक :
रुरलबँक - सप्टेंबरपासूनते ६, १२,१३,१९,२०,२६,२७ सप्टेंबर.
प्रोबेशनरीऑफिसर पूर्व परीक्षा : ऑक्टोबरते ४, १०, ११ ऑक्टोबरपर्यंत असेल.
मुख्यपरीक्षा : ३१ऑक्टोबर रोजी होईल.
क्लार्कपदासाठी लेखी परीक्षा : डिसेंबरते २० डिसेंबर
मुख्यपरीक्षा : जानेवारी२०१६