आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर- तालुक्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- तालुक्यातील नांदूरढोक येथील एका तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. ८) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

गणेश दिलीप गाढे (२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश हा त्याचाच नांदूरढोक शिवारातील गट क्रमांक १२१ मधील विहिरीत सकाळी मृतावस्थेत आढळून आला. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष घोडके, हवालदार ए. आर. नेवे आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिस पाटील पोपट गाढे यांनी दिलेल्या माहितीवरून विरगाव ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विहामांडवा- शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विहामांडवा परिसरातील हनुमाननगर येथे गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. दिलीप परमेश्वर सातपुते (३५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नापिकी आणि आर्थिक संकटाला नेहमी सामोरे जावे लागत असल्याच्या नैरश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांच्या वतीने सांगण्यात आले. या प्रकरणी विहामांडवा पोलिस चौकीचे बीट जमादार एस. डी. मदने यांनी पंचनामा करून घटनेची नोंद घेतली आहे. पुढील तपास पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार मदने करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...