आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन उड्डाणपूल पर्यटन माहिती केंद्राचे आज उद्घाटन, आदित्य ठाकरे यांची उपस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिडको बसस्टँड चौक महावीर चौकातील उड्डाणपूल तसेच मनपाच्या पर्यटन माहिती केंद्रांचे उद्घाटन उद्या (दि. २०) युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय ते मनपातील शिवसेनेचे पदाधिकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.
शहराच्या वाहतुकीची कोंडी सोडवू शकणारे दोन उड्डाणपूल तयार झाले असून ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. उद्या सोमवारी ठाकरे यांच्या हस्ते या पुलांचे लोकार्पण होणार आहे. सकाळी १० वाजता सिडको बसस्टँड उड्डाणपुलाचे उद्घाटन होईल त्यानंतर महावीर चौकातील उड्डाणपुलाचे उद््घाटन होणार आहे. मुख्य कार्यक्रम सिडकोच्या उड्डाणपुलाचा असणार आहे. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री विजय देशमुख, खासदार राजकुमार धूत, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर त्र्यंबक तुपे आदींची उपस्थिती राहणार आहे.

रेल्वेस्थानका नजीक महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या पर्यटन माहिती केंद्राचे सकाळी ११ वाजता ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार अाहे. शहरात चार ठिकाणी अशी केंद्रे उभारली जाणार आहेत. यानंतर महापौर निवासस्थानी ठाकरे हे मनपातील शिवसेनेचे पदाधिकारी मनपातील अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. मनपा निवडणुकीनंतर ठाकरे यांनी अापण औरंगाबादकडे विशेष लक्ष देणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन मार्गाची पाहणी वगळता फारसे लक्ष दिले नव्हते. आता उद्या मात्र ते कामांचा आढावा घेणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...