आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगळे-वेगळे: दोन मैत्रिणींनी घराच्या छतावर फुलवली परिपूर्ण बाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- परसात भाजीपाला आणि फुलझाडे लावणारे अनेक जण असतात, पण सिडको एन-7 मध्ये दोन मैत्रिणींनी भाजीपाल्याची बाग फुलवतानाच औषधी वनस्पती आणि सुगंधी वनस्पतींचीही लागवड केली आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे केवळ स्वत:पुरताच हा छंद जोपासला नाही तर इतरांनाही अशी बाग फुलवण्यास उद्युक्त केले. विशेष म्हणजे हे करताना त्यांनी वाया जाणार्‍या पाण्याचा उपयोग यासाठी केला आहे. एवढेच नव्हे तर छतावर बाग फुलवणार्‍या या दोन मैत्रिणी या बागेतून घरच्या घरी आवळा पावडर आणि दंतमंजनही तयार करतात. म्हणूनच त्यांची ही बाग आणि हे काम इतरांपेक्षा वेगळे ठरले आहे.

सिडको एन-7 मध्ये असलेल्या पोलिस कॉलनीत मीनाक्षी बावळे या महिलेचे घर आहे. 1992 ला सिडकोच्या एलआयजी योजनेतून त्यांना कौलारू छत असलेले घर मिळाले. पुढे 1997 ला त्यांनी या घराचे बांधकाम केले. पती विनोद बावळे हे विभागीय कृषी कार्यालयात कार्यरत आहेत. त्यामुळे बाग, झाडे याबाबत त्यांना मनापासून आवड. फावल्या वेळात त्या कृषीविषयक पुस्तके वाचण्याचा छंद जोपासतात. त्यातूनच त्यांनी छतावर बाग फुलवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला केवळ गुलाब आणि दोडक्याचा वेल लावला. नंतर 2002 पासून त्यांनी 1 हजार स्क्वेअर फुटांच्या हक्काच्या आरसीसी छताचा पुरेपूर फायदा घेतला. त्यावर त्यांनी 28 बाय 30 च्या जागेवर 13 वर्षांपासून बाग फुलवली.