आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलावात बुडून दोन मित्रांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गंमत म्हणून खेळण्यासाठी गेलेल्या दोन जिवलग मित्रांचा तलावात बुडून करुण अंत झाल्याची घटना घडली. सातारा परिसरातील सुधाकरनगर येथील टायगर हिल्स तलावात मंगळवारी सायंकाळी च्या सुमारास हा प्रकार समोर आला. रात्री ७.३० पर्यंत दोघांचे मृतदेह काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. तलावातील गाळात पाय अडकल्याने दोघेही बुडाल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला.

धनराज धनाड (१८, रा. एन -८) गिरीश दहिवाल (१८, रा. आंबेडकरनगर) अशी मृत तरुणांची नावे आहेत. धनराज छत्रपती महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या बारावीमध्ये शिक्षण घेत होता, तर गिरीश सरस्वती भुवन महाविद्यालयात कॉमर्स शाखेच्या बारावीत शिकत होता. धनराज, गिरीश इतर पाचही जण वाजेच्या सुमारास टायगर हिल्स तलावाजवळ गेले. या वेळी दोघेही पोहण्यासाठी तलावात उतरले होते.
बातम्या आणखी आहेत...