आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच हजारांत बनवला बाटल्यांपासून सोफा, सोफा निर्मितीसाठी लागलेल्या वस्तू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंचा वापर संपला की आपण त्यांना भंगाराची वाट दाखवतो. परंतु अशा वस्तूंकडे कल्पकतेने पाहिल्यास ती दैनंदिन वापरातीलच महत्त्वपूर्ण वस्तू ठरू शकते, याचे उदाहरण शहरातीलच एका ३२ वर्षीय व्यावसायिकाने दाखवून दिले आहे.
खोकडपुऱ्यातील बापूनगर भागातील सुरेश गरड यांनी प्रिंटर झेरॉक्स मशीनसाठी लागणाऱ्या टोनरच्या (शाई) रिकाम्या बाटल्यांपासून बनवलेला सोफा या तरुणाच्या दिवाणखान्यातील शान बनला आहे.
सुरेश गरड यांचा कॉम्प्युटर स्टेशनरी विक्रीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात सोफा खरेदीसाठी गेले होते, परंतु त्याच्या भरमसाट किमती पाहून सोफा सेट खरेदी करणे अशक्य वाटल्याने त्यांनी खरेदीचा निर्णय बदलला. एका दिवशी ते दुकानात बसले असता त्यांची नजर टोनरच्या रिकाम्या बाटल्यांवर पडली आणि त्यांची कल्पकता जागृत झाली.
याच बाटल्यांपासून सोफा बनवता येईल काय, यावर त्यांनी विचार केला आणि विचारांना कृतीची जोड मिळाली. टोनरच्या बाटल्यांपासूनच सोफा तयार करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. प्लास्टिकच्या या जाड बाटल्या एरवी ते भंगारातच विकायचे. पण आता सोफा बनवण्याच्या विचारातून त्यांनी त्यातल्या पाच-सहा बाटल्यांवर उभे राहून बघितले. त्यांची मजबुती लक्षात येताच त्यांनी या बाटल्यांना सोफ्याचा आकार देण्यासाठी एकावर एक रचल्या. मात्र, बाटल्या किती लागणार, कशा जोडणार,आकार कसा जमवणार असे विविध प्रश्न त्यांच्या समोर उभे राहिले.
बाटल्या जोडण्यासाठी त्यांनी प्रथम विविध चिकटवण्याचे साहित्य वापरले. परंतु बाटल्या मजबूतपणे जोडल्या जात नव्हत्या. नंतर ग्ल्युस्टिकच्या मदतीने ५० बाटल्या चिकटवल्या. त्यावर उभे राहून, बसून पाहिले. त्या मजबूत चिकटल्याचे निश्चित हाेताच त्यांनी सोफा निर्मितीला सुरुवात केली. अवघ्या २० दिवसांत दोन व्यक्ती बसू शकतील अशा आकाराचा सोफा बनवून आव्हान पूर्ण केले.

९३० बाटल्या
०४ इंचरेक्झिन
८३ ग्ल्युगन
१८० किलो ग्रॅम
२५०० रुपये खर्च
२० दिवसबनला
-सोफा वॉटरप्रूफ, सजावटीसाठी रेक्झिन, प्लास्टिक कुशनचा वापर
-सोफ्यामध्ये चार्जिंगसाठी प्लगचीही व्यवस्था

असा झाला सोफा तयार
सोफ्याच्या चारही बाजू आधी तयार केल्या. प्रथम पाठीमागचा भाग, त्यानंतर हात ठेवण्याच्या दोन्ही बाजू शेवटी मध्यभाग तयार केला. यासाठी त्यांनी प्लास्टिक स्पंज, साधे स्पंज, रेग्झिनचा वापर केला. यातून जवळपास ५० इंचाचा सोफा तयार झाला.
कल्पकता