आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकुंदवाडीत दोघांची रेल्वेखाली आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुकुंदवाडी परिसरातील दोन व्यक्तींनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. पहिल्या घटनेत विजय शिवनाथ बोर्डे (२८, संजयनगर, मुकुंदवाडी) या तरुणाने शनिवारी सकाळी ९.५० च्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहिली असून पत्नी आणि बहिणीवर आपले खूप प्रेम आहे. मी परत येईन, अशा आशयाचा मजकूर इंग्रजीत लिहिलेला होता. पाच वर्षांपूर्वी विजयच्या वडिलांचे निधन झाले. चार वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. मिळेल ते काम करून तो उदरनिर्वाह करत होता, अशी माहिती मुकुंदवाडी पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार जी. के. चव्हाण करत आहेत.
दुसऱ्या घटनेत रामराव केशव पेंढारकर (५५, एपीआय कॉर्नर, भवानी पेट्रोल पंपाच्या मागे, मुकुंदवाडी) यांनी शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामराव यांना दम्याचा त्रास असल्याने त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बातम्या आणखी आहेत...