आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवार्ता : शहरातून दोन मोबाइल, दोन दुचाक्या चोरीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातून बुधवारी दोन मोबाइल आणि दोन दुचाक्या चोरीला गेल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनांत ३५ हजारांचा माल चोरीला गेल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली. निवृत्त प्राध्यापक हरी गोविंद ढोकरीकर (रा. सहकारनगर) हे नोव्हेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकात बसमधून उतरत असताना त्यांच्या शर्टच्या खिशातून रेड मी कंपनीचा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरट्याने लांबवला. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बायजीपुरा येथील अंजली अहिरे (३९) यांच्या घरात प्रवेश करून चोरट्याने दोन मोबाइल चोरून नेले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी चोरीच्या पहिल्या घटनेत संसारनगर येथील रहिवासी सुनील जावळे यांचा मुलगा शारदाश्रम कॉलनी येथे कोचिंग क्लासला दुचाकीने गेला असता त्याची हॅर्क्युलस डायनामाइट ही दुचाकी क्लाससमोरून चोरीस गेली. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सातारा परिसरातील संतोष बोर्डे, साई संकेत पार्क यांची दुचाकी (एमएच २० एएम ४४९५) चोरट्याने लंपास केली. उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.