आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना आमदार संदिपान भुमरे यांना दोन महिन्यांची कैद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांनी एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असताना कारखान्यातील निवृत्त कर्मचाऱ्यास निवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ दिल्यामुळे त्यांना कामगार न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. आवटे यांनी दोन महिन्यांची साधी शिक्षा सुनावली आहे. कारखान्याचे निवृत्त कर्मचारी शेख गफूर शेख हुसेन (रा. कारकीन, ता. पैठण) यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मार्च २००९ रोजी तक्रारदारास कारखान्याने लाख ६६ हजार १४५ रुपये द.सा.द.शे. टक्के व्याजासह आणि खर्च म्हणून हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. याची कारखान्याचे चेअरमन व्यवस्थापकीय संचालकांनी दखल घेतली नव्हती. त्यामुळे तक्रारदाराने अॅड. रमेश इमले यांच्या वतीने आमदार भुमरे व्यवस्थापकीय संचालक भीमराव डोके यांच्याविरुद्ध दाद मागितली होती. या प्रकरणात दोघांना दोन महिन्यांची शिक्षा सुनावली.
बातम्या आणखी आहेत...