आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - परळी, बीड येथील स्त्री भ्रूणहत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेत मंगळवारी रात्री उशिरा शहरातील दोन सोनोग्राफी सेंटर्सला सील ठोकण्यात आले. रोकडिया हनुमान कॉलनी येथील डॉ. निर्मला कदम यांच्या धन्वंतरी हॉस्पिटल, गजानन महाराज मंदिरासमोरील डॉ. मधुश्री सावजी यांच्या सावजी-तुपकरी हॉस्पिटलवर ही कारवाई करण्यात आली.
मनपा, महसूल विभागाने अवैधरीत्या गर्भलिंगनिदान करणा-या सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी मोहीम सोमवारी हाती घेतली. सुराणानगरातील डॉ. विनायक खेडकर यांच्या ज्योती मॅटर्निटी होममधील दोन यंत्रे सील करण्यात आली होती. प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी मंगळवारी मोहिमेची व्याप्ती वाढवली. महसूल, आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांची त्यांनी दुपारी बैठक घेतली. त्यात दहा पथके स्थापन करण्यात आली. प्रत्येक पथकात 4 ते 6 कर्मचारी होते. रात्री नऊच्या सुमारास एका पथकाने धन्वंतरी हॉस्पिटलमधील कागदपत्रांची तपासणी केली. तेव्हा तेथे गर्भलिंगनिदान चाचणीच्या फॉर्ममध्ये माहिती भरण्यात अनियमितता आढळून आली. असाच प्रकार सावजी- तुपकरी रुग्णालयातही आढळला. तेथील सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आले. डॉ. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनीषा भोंडवे, डॉ. संध्या कुलकर्णी यांनी ही कारवाई केली.
कंसांचा सुळसुळाट (अग्रलेख)
सुदाम मुंडे हाजिर होः 3 जुलैपर्यंत अल्टिमेटम
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.