आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश बोरसेचे आणखी दोन साथीदार अटकेत; रावसाहेब दानवेंचे नाव घेऊन करत होता फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे नाव सांगून राज्यातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या गणेश पाटील बोरसेने राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांचेही नाव सांगून अनेकांना गंडवल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली आहे. 

पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांनी अटक केली असून या त्रिकुटाने नऊ वर्षांपासून अनेकांना फसवून तब्बल अडीच कोटी रुपये कमावल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अजय ऊर्फ विक्की गवई (३१, रा. बुलडाणा) गणेश पवार (३२, रा. कराड, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. क्रांती चौक पोलिस ठाण्यासह सिटी चौक आणि वाळूज पोलिस ठाण्यातही बोरसेच्या विरोधात फसवणुकीचे दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दानवे यांचा जवळचा नातेवाईक असून, त्यांचा पी.ए. आहे असे सांगून गणेश बोरसे याने राज्यभरातील अनेकांकडून कोट्यवधी रुपये उकळले. परभणीतील प्रमोद वाकोडकर या व्यापाऱ्यास बोरसेने एक लाख रुपयांस फसविल्याची तक्रार गुरुवारी रात्री नोंदविल्यानंतर त्याला अटक करण्यात आली हाेती. 

बनावट लेटरपॅड सापडले...
बोरसेच्याकरजगावातील (जि. जालना) घराची पोलिसांनी झडती घेतली. तेथे काही शैक्षणिक कागदपत्रे, मुख्यमंत्र्याच्या नावाचे बनावट लेटरपॅड सापडले. बोरसे त्याचे साथीदार वर्षांपासून अनेकांना गंडवित आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचे नाव सांगून पैसे उकळले आहेत. पोलिसांनी बोरसेची दोन बँक खाते सील केली आहेत. अटकेतील दोघे बोरसेला गिऱ्हाईक मिळून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...