आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण घाटीत दाखल, चिंतेचे कारण नसल्याचा डॉक्टरांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्वाइनफ्लूमुळे शहरातील एक जण बुधवारी दगावला. मात्र, यामुळे चिंतेचे कारण नाही, असे घाटी रुग्णालय, मनपा आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांिगतले. त्यास २४ तास उलटण्यापूर्वीच शहरातील दोघांना या जीवघेण्या आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांना तातडीने घाटीच्या स्वाइन फ्लू उपचार विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

बाँबे मर्कंटाइल बँकेतील शिपाई शब्बीर मुस्तफा हुसेन (रा. आरेफ कॉलनी) दोन जानेवारीला मुंबई येथून औरंगाबादेत परतले. तेव्हा त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. आधी घरानजीकच्या एका दवाखान्यात उपचार घेतल्यावर त्यांना समर्थनगरातील साई हॉस्पिटल आणि त्यानंतर घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितलेली औषधी त्यांना वेळेवर मिळालीच नाही आणि २१ जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात चिंतेचे वातावरण पसरले. परंतु औरंगाबादेत या रोगाचा संसर्ग वाढण्याची शक्यताच नाही, असे घाटीच्या औषधी विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी म्हटले होते. मात्र, आज एन-१२, हिमायतबाग येथील सत्यविष्णू हॉस्पिटलसमोर राहणारे ४८ वर्षीय रहीम जापला अब्दुल आणि बाबा पेट्रोल पंपाजवळील हायवे अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ४६ वर्षीय शबाना हसन सय्यद या दोघांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान करण्यात आले. हे दोघेही बाँबे मर्कंटाइल बँकेत काम करतात. खासगी पॅथलॅबमध्ये केलेल्या दोघांच्याही चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यांना घाटीच्या स्वाइन फ्लू वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ. बोरकर यांनी सांगितले.

स्वाइन फ्लूबाबत डॉक्टरांचे मार्गदर्शन
बँकेतीलआणखी दोन कर्मचाऱ्यांनी सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यांना औषधोपचार करून घरी पाठवण्यात आले. शिवाय बँकेतील इतर १८ कर्मचाऱ्यांनीही घाटीत जाऊन तपासणी केली. मात्र, कुठलीही लक्षणे नसल्याने त्यांना परत पाठवण्यात आले. घाटीतील डॉक्टरांनी त्यांना स्वाइन फ्लूची लक्षणे सांगून काळजी कशी घ्यावी, याबद्दलही मार्गदर्शन केले