वाळूज - नागापूर शिवारात शेतातील उभ्या पिकांत बकऱ्या गेल्याच्या वादावरून झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला होता, तर संतप्त लोकांच्या मारहाणीत चालकासह गोळीबार करणारा जखमी झाला होता. ही घटना रविवारी (१६ नोव्हेंबर) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली होती.
याप्रकरणी आरोपी रऊफ वाहब पटेल (४०) व त्यांचा वाहनचालक शेख अब्दुल शेख अब्बास(५२) (दोघेही रा. खंडोबाचे सातारा) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोेंदवला होता. त्यातील दोन्ही आरोपींना पोलिस निरीक्षक अशोक कदम, सहायक फौजदार संजय बनकर आदींच्या पथकाने बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास टक केली.
आरोपींवर जावेद कुरेशीला ठार मारण्याच्या प्रयत्नासह भारतीय हत्त्यार कायदा परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.