आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Police Catch By Anti Corruption Department When The Tace Bribe , Divya Marathi

दोन पोलिसांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तरुणाकडून पाच हजार रुपयांची लाच घेणार्‍या बेगमपुरा ठाण्याच्या जमादारासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पोलिस ठाण्यासमोर दुपारी रंगेहाथ पकडले. जमादार प्रकाश नामदेव दांडगे (रा. एन-10, पोलिस कॉलनी, हडको) आणि शिपाई अँथोनी लुइस फ्रान्सिस (रा. न्यू नंदनवन कॉलनी) अशी दोघांची नावे आहेत.

तक्रारदाराने त्याच्या मित्राला 26 हजार रुपये दिले होते. चार दिवसांत पैस परत न केल्यास माझी दुचाकी वापरण्यासाठी घेऊन जावी, असे शंभर रुपयांच्या मुद्रांकावर लेखी दिले होते. ठरलेल्या तारखेला पैसे न मिळाल्याने तक्रारदाराने दुचाकी वापरण्यासाठी नेली. मात्र, मित्राने आपली दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार बेगमपुरा ठाण्यात दिली. या प्रकरणाची चौकशी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील जमादार प्रकाश दांडगे आणि शिपाई अँथोनी फ्रान्सिस यांच्याकडे होती. दरम्यान, चार दिवसांपूर्वी दोन्ही मित्रांमधील आर्थिक व्यवहार मिटला होता; पण पोलिसांनी तक्रारदाराला बुधवारी सकाळी ठाण्यात बोलावून घेतले. दुचाकी चोरल्याची तक्रार आमच्याकडे आली असून प्रकरण मिटवण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. शेवटी पाच हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. याआधारे उपअधीक्षक सुरेश वानखेडे, प्रताप शिकारे, प्रवीण मोरे, निरीक्षक ए. व्ही. रायकर, कैलास कामठे, प्रमोद पाटील, हरिभाऊ कुर्‍हे, र्शीराम नांदुरे, अजय आबले, सुनील फेपाळे, नितीन घोडके, चालक शेख मतीन यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्याजवळ सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.