आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवार्ता: आरोपी फरारप्रकरणी दोन पोलिस निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कर्तव्यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या दोन पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. न्यायालयात साक्ष झाल्यानंतर परत तुरुंगात नेत असताना सिडको बसस्थानकावरून पळून गेलेल्या अट्टल गुन्हेगाराने चालत्या बसमधून उडी मारून तो पसार झाला होता. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली होती.
आरोपीच्या शोधासाठी विविध पथके तयार केली होती. पण २४ तासांनंतरही तो सापडल्याने दोन पोलिसांवर ही कारवाई करण्यात आली. सतीश नज्या ऊर्फ सतीश जगन्नाथ चव्हाण (३४, रा. गेवराई, बीड) असे आरोपीचे नाव आहे. त्याला हर्सूल कारागृहात घेऊन जाणारे पोलिस हवालदार बाळा शिंदे आणि सहायक फौजदार रखमाजी राऊत यांना निलंबित केले.

आरोपी मूळ गेवराईचा असला तरीही हल्ली त्याचा मुक्काम पैठण येथील नवाब बस्ती, दादेगाव येथे होता. तो पळून गेल्यानंतर पोलिसांचे एक पथक त्याठिकाणी पाठवले होते. मात्र तो सापडला नाही. गुरुवारी सकाळी तो सिडकोतील कलाग्राम जवळ फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस पथक तेथे गेले असता तो सापडला नाही. पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांना विचारले असता आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आलेली आहेत असे सांगितले.