आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Police Suspended The Shruti Case In Aurangabad

श्रुतीप्रकरणी दोन पोलिस निलंबित, पाेलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरुन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - श्रुती कुलकर्णी आत्महत्याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्याच्या दोन पोलिसांना निलंबित करून फौजदार हरीश खटावकर यांची आयुक्तालयातील कंट्रोल रूममध्ये बदली करण्यात आली. तसेच त्यांची खातेअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश शुक्रवारी पाेलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांना दिले. सहायक फौजदार राजू वैष्णव आणि हवालदार नाना दादाराव हिवाळे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.

श्रुतीच्या आत्महत्याप्रकरणी तक्रार करणाऱ्या कुलकर्णी कुटुंबीयांशी सिडको पोलिस ठाण्याचे फौजदार हरीश खटावकर यांनी अश्लील भाषेचा वापर केला होता. तक्रारीच्या भानगडीत कशासाठी पडता? अशी धमकी दिली होती, असा आरोप कुलकर्णी कुटुंबीयांनी केला होता. शनिवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल घेत त्यांनी कारवाई केली. दरम्यान, हे माझ्या विरूध्द षडयंत्र असल्याचे खटावकर म्हणाले.

स्वप्निल संतोष मणियार हा श्रुती कुलकर्णीला त्रास देत होता वारंवार फाेन करून लग्नाचा तगादा लावत हाेता. त्याच्या जाचाला कंटाळून कुलकर्णी कुटुंबीय सिडको ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. त्या वेळी फौजदार खटावकर यांनी "तुझ्या आईला तुझ्या वडिलांनी सोडून दिले होते. तुम्ही दोघी बहिणीही तशाच असणार. तक्रारीच्या भानगडीत पडू नका,' असे सुनावले हाेते, असा आरोप मृत तरुणीची बहीण श्रद्धा मामा तानाजी गाड यांनी केला होता. या बाबत कुलकर्णी कुटुंबीयांनी आयुक्तांची भेट घेतली.

आयुक्तांचे आवाहन
मुलींना,महिलांना कुणी त्रास देत असेल तर त्यांनी थेट आमच्याकडे तक्रार केली तर त्याची दखल घेऊ. तक्रारीसाठी व्हाॅट्सअॅप नंबर दिलेले आहेत. दामिनी पथक आहे. तसेच संबंधित पोलिस ठाण्याकडे तक्रार करू शकता.

याक्रमांकावर मुली, महिलांनी तक्रार करावी
जरमुलींना,महिलांना कुणी त्रास देतअसेल तर त्यांनी आत्महत्येसारखे प्रकार करता दामीनी पथक मोबाइल क्रमांक ९१५८०४२४४४, १००, ०२४० २२४०५००, ०२४० २५१३४८ या क्रमांकांवर फोन करुन तक्रार करावी.

खटावकरांची चौकशी
फौजदारहरीश खटावकरांनी अश्लील भाषा वापरली, अशी तक्रार माझ्याकडे कुलकर्णी कुटुंबीयांनी केली. वृत्तपत्रांमध्येही मी वाचली. याची दखल घेत मी उपायुक्त वसंत परदेशी यांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अमितेश कुमार,पोलिस आयुक्त

रिपाइंची मागणी...
बेजबाबदारपोलिसांवर कारवाई करण्याची मागणी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे. या तरुणीने दोनदा पोलिसांकडे तक्रार करूनही त्यांनी गुन्हेगाराच्या बाबतीत ठोस पाऊल उचलल्याने हा प्रकार घडला. दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी अॅड. भगवान भोजने, तनुजा खोसरे, नितीन वाव्हळे यांनी केली आहे.

ब्राह्मण महासंघाचा इशारा
श्रुतीकुलकर्णी आत्महत्या प्रकरणात जेवढा स्वप्निल मणियार दोषी आहे तेवढेच सिडको पोलिसही जबाबदार आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महासंंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल मुळे यांनी दिला आहे. गौरव टाकळकर, संदीप कुलकर्णी, मयूर देशपांडे, मंगेश पळसकर, मिलिंद पिंपळे, सतीश मंडपे, वसंत किनगावकर, अॅड. पी. कारेगावकर यांनी दिला.
पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही
श्रुतीचीआत्महत्या टळू शकली असती. पण पोलिसांनी त्यांची जबाबदारी गंभीरपणे पार पाडली नाही. श्रुतीला त्रास देणाऱ्या मुलाची मानसिक चाचणी घेतली असती तर श्रुतीवर आत्महत्येची वेळ आली नसती.
महिलांच्या प्रश्नांवर लढे उभारणाऱ्या प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या, महाराष्ट्र भूषण डॉ. राणी बंग एका महाविद्यालयातर्फे आयोजित कार्यशाळेसाठी गुरुवारी औरंगाबादेत होत्या. श्रुती कुलकर्णीच्या आत्महत्येने त्यांनाही धक्का बसला. युवतींचे शोषण, सामाजिक स्वास्थ्य आदींविषयी त्यांनी केलेले भाष्य त्यांच्याच शब्दांत...

आज सकाळीच श्रुतीच्या आत्महत्येची घटना कळाली. आणि मला जबर धक्का बसला. आपली संस्कृती कुठे चालली आहे, हेच कळत नाहीये. खरेतर यात पोलिसांची भूमिका फार महत्वाची होती. पहिल्यांदा अटक केल्यावर त्यांनी श्रुतीला छळणाऱ्या मुलाची वैद्यकीय मानसिक चाचणी केली असती तर ही घटनाच घडलीच नसती. माझ्या मते बलात्कार हा शरीरावर आहे. मनावर तो कधीच होत नाही.