आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सख्ख्या बहिणींचा नाल्यात बुडून अंत; सिपोरा बाजारातील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन- नाल्याशेजारीखेळणाऱ्या दोन सख्ख्या बहिणी तोल जाऊन पाण्यात पडल्या. आसपास त्यांना वाचवायला कोणीही नसल्याने या दोघींचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सालिया युनूस शेख (५), शमा युनूस शेख (४) असे मृत मुलींची नावे आहेत.

सालिया शमा या दोघी बहिणी दोन वर्षांपासून सिपोरा बाजार येथे आजोबा शेख महबूब यांच्याकडे राहतात. शेख यांच्या घरापासून ५० फुट अंतरावरून नाला जातो. या नाल्याचे काही दिवसांपूर्वीच खोलीकरण करण्यात आले होते. शिवाय मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे या नाल्यात बऱ्यापैकी पाणी साठले होते. बुधवारी मुलीची आई शेख नगिना या घरात काम करत होत्या. या वेळी सालिया शमा या दोघी अंगणात खेळत होत्या. खेळता खेळता या मुली नाल्यात पडल्या.

दोनच मुली, त्याही नियतीने हिरावल्या
नगिना युनूस शेख यांना दोनच मुली होत्या. त्यांनाही काळाने हिरावून नेल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे गाव परिसरात शोककळा पसरली होती. दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती देऊनही त्यांनी घटनास्थळी येण्याची तसदी घेतली नाही.