आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन सोनोग्राफी केंद्रे सील, सहा जणांवर गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- सोनाग्राफीद्वारे लिंगनिदान करून अवैधरीत्या औषधी देऊन गर्भपाताचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या प्रकरणाची चौकशी करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी पोलिसात तक्रार दिली. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सिंदखेडराजा येथील साई डायग्नोस्टिक हे सोनोग्राफी सेंटर सील केले आहे.

लिंगभेद निदान करण्यासाठी २२ हजारांचा खर्च येईल असे यातील गरोदर माता राणी (नाव बदलले आहे) हिस सांगितले होते. शिवाय, तडजोडीअंती १९ हजार रुपये देऊन निदान करण्याचे ठरले होते. यानुसार दोन नातेवाईक महिला राणीला घेऊन सिंदखेडराजा येथे गेल्या. याठिकाणी साई डायग्नोस्टिक सेेंटरमध्ये सोनाग्राफी केल्यावर राणीच्या गर्भात मुलगी असल्याचे तेथील डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यानंतर रविवारी गर्भपात करण्याचा प्लॅन आखण्यात आला. तत्पूर्वी जालना शहरातील अग्रवाल हॉस्पिटलमधील कमल नावाच्या नर्सची भेट घेण्यात आली.
कमलने गर्भपातासाठी सुरुवातीला हजार रुपये सांगितले ४५०० रुपये घेतले. कमलने ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी येऊन राणीला गर्भपाताची गोळी खायला दिली. तसेच परत दुपारी वाजता येईल, असे सांगून निघून गेली. जमुनानगर (रेल्वेस्टेशनजवळ, जालना) येथे शिवाजी मिसाळ यांच्या घरी राणीचा अवैध गर्भपात होणार असल्याची माहिती डॉ. पाटील यांना मिळाली होती, त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सरिता पाटील यांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

जालना सिंदखेडराजात सोनाग्राफी सील
बुलडाणायेथील जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी पथकाच्या मदतीने कारवाई करीत सिंदखेडराजा येथील साई डायग्नोस्टिक सेंटरला सील केले. महत्त्वाचे रेकार्डहीजप्त केले. तसेच जालना येथील अग्रवाल हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अग्रवाल यांची सोनोग्राफी मशीन सील दोन वर्षाचे रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहे.

यांच्या विरुद्ध तक्रार
निवृत्तीकदम (धानोरा ता.भोकरदन), डॉ. सदानंद बनसोड (साई डायग्नोस्टिक, सिंदखेड), कमल साळवे, रेणुका विलास मिसाळ, शीला शिवाजी मिसाळ, (जालना), ज्ञानेश्वर नारायण भालसिंग (पीरकल्याण ता.जि.जालना) यांनी संगनमताने अवैध गर्भपाताचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.

एक मेडिकल सील
ज्ञानेश्वर भालसिंग याने दिलेल्या चार गोळ्यांपैकी एक गोळी राणीला खायला दिली होती. तर उर्वरित तीन गोळ्या नाल्यामध्ये फेकून दिल्याची कबुली कमलने दिली. ज्या ठिकाणाहून ह्या गोळ्या घेतल्या ते माउली मेडिकल सील करण्यात आले आहे.

गरोदर माता आरोपी नाही, दोषी
यातील गरोदर माता अर्थात राणी ही गर्भवती असल्यामुळे पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत आरोपी ठरत नाही. यामुळे ती या प्रकरणात साक्षीदार आहे. मात्र, एमटीपी कायद्यानुसार तिने अवैध गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती दोषी आहे.

त्रास झाल्यानंतर रुग्णालयात
राणीला गर्भपाताची गोळी दिल्यामुळे तिला त्रास होत होण्यास सुरुवात झाली. यामुळे डॉ. पाटील रेडीआेलाॅजिस्ट डॉ. विद्या शिंदे यांनी राणीला तातडीने महिला बाल रुग्णालयात दाखल केले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत.
बातम्या आणखी आहेत...