आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद तालुक्यासाठी दाेन तहसील कार्यालये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबादच्यातहसील विभाजनाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, दोन तहसील स्थापण्याचा निर्णय ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद तहसीलमध्ये शहरासह तालुक्यातील २१० गावे, ५४ तलाठी सज्जे येतात.या तहसीलवर कामाचा मोठा ताण असल्याने तिचे विभाजन करून शहरासाठी एक आणि ग्रामीणसाठी एक तहसील करण्याचा प्रस्ताव आहे. भविष्यात शहराचा विस्तार होणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या संदर्भात चार वेळा प्रस्ताव पाठवले होते. काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात महसूलमंत्री एकनाथ खडसे, महसूल सचिव विक्रम कुमार यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. वरिष्ठ पातळीवर विभाजनाची प्रक्रिया सुरू आहे. १५ ऑगस्टपूर्वी त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे सूत्रांनी सांगितले.

४५ कर्मचाऱ्यांची केली मागणी
विभाजनानंतर नव्या तहसीलसाठी ४५ कर्मचारी द्यावेत, असा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला. त्यात एक तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, १७ लिपिक, १० शिपाई आदींचा समावेश आहे.

नव्या रिलायन्स मॉलशेजारील मनपाची जागा, गरवारे स्टेडियम परिसरातील जागा चिकलठाण्यातील सिपेटच्या जागेचा पर्याय देण्यात आला आहे.