आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने औरंगाबाद शहरात गॅस्ट्रोचे थैमान, 2600 रुग्णांना गॅस्ट्रोची लागण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद शहरात 2600 जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे समोर आले आहे. रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने शहरात गॅस्ट्रोने थैमान घातल्याचे औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी म्हटले आहे. ड्रेनेजचे पाणी कुणाच्या चुकीमुळे पसरले, याबाबत चौकशी करणार असल्याचे महापौर यांनी सांगितले.

छावणी परिसरात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या तीन दिवसांत 2600वर पोहोचली आहे. आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन घाटी तसेच लष्कराच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी छावणी रुग्णालयात धाव घेत मदतकार्य केले. छावणी रुग्णालयात सध्या 35 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकून 1200 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्‍यात आले होते. उर्वरित रुग्णांना औषधी देऊन घरी पाठवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद धामंदे यांनी दिली.

जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांवर उपचार
30 खाटांच्या रुग्णालयात इतक्या रुग्णांसाठी सोय नसल्याने जमिनीवर गाद्या टाकून उपचार सुरू करण्यात आले. रखमाजी जाधव यांनी मंडप, गाद्या आणि पलंगांची सोय केली. स्वयंसेवी संस्था, संघटना मदतीसाठी धावल्या. मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर यांनी छावणी रुग्णालयाला भेट दिली.

छावणी परिसरातून ग्रॅस्ट्रोची सुरुवात...
औरंगाबादमधल्या छावणी परिसरातून या रोगाची सुरुवात झाली. छावणीतील विविध भागांतील अनेक नागरिकांना मध्यरात्रीनंतर अचानक पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. पाहता पाहता या त्रासाने संपूर्ण छावणी परिसराला वेढा घातला. लहान मुले, महिला-पुरुष, युवक-युवती, ज्येष्ठ अशा सर्वांना या आजाराने वेढले असल्यामुळे उपचारासाठी नागरिकांनी छावणी सामान्य रुग्णालयात धाव घेतली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा...  पाण्याच्या टाकीत कुत्र्याच्या मृत्यूची अफवा
बातम्या आणखी आहेत...