आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन हजार महिलांची दहा लाखांची फसवणूक, तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; दोनहजार महिलांना स्वयंरोजगाराचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणारा भामटा दोन दिवसांपासून फरार आहे. त्याच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात फसवणूक झालेल्या महिलांनी शनिवारी तक्रार अर्ज दिला. मात्र रविवारी संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले.

चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनी येथील अरुणा कैलास नवले यांच्या घरात लक्ष्मण केंद्रे शंकर पतंगे हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून भाड्याने राहतात. या दोघांनी महिलांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शनिवारपासून केंद्रे फरार आहे. त्याचा फोन बंद आहे. त्यामुळे त्याने आपली फसवणूक केली, अशी तक्रार या महिलांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात केली आहे.

काय आहे नेमका प्रकार : चौधरीकॉलनीत केंद्रे आणि पतंगे यांनी साईकृपा सर्व्हिसेस अँड मार्केटिंग या नावाचे ऑफिस सुरू करून कापडी पिशव्या तयार करण्याचा उद्योग सुरू केला होता. त्यासाठी लागणारा कच्चा माल केंद्रे हा महिलांना पुरवत होता. प्रत्येक महिलेने ५० पिशव्या शिवल्यानंतर त्यांना ८० रुपये मिळत होते. अशा प्रकारे महिलांकडून पैसे उकळण्यासाठी त्याने १४० महिला सुपरवायझरची नेमणूक केली होती. महिलांनी पाचशे, हजार रुपये केंद्रेकडे जमा केले होते. महिनाभर केंद्रे आणि पतंगे यांनी महिलांना त्यांचा मोबदला दिला. शुक्रवारी मात्र हैदराबादला जातो असे सांगून तो पैसे घेऊन फरार झाला. काही महिलांनी पतंगेला पकडून पोलिस ठाण्यात नेले. मात्र चौकशी करता पोलिसांनी त्याला सोडून दिले, असे तक्रारदारांनी सांगितले.

चौकशी सुरू
याबाबतशनिवारी तपास अधिकारी मधुकर शिंदे यांना विचारले असता त्यांनी गुन्हा दाखल केला नसून फक्त तक्रार अर्ज आला असल्याचे सांगितले. याबाबत चौकशी सुरू असून त्यानंतर गुन्हा दाखल होईल. यासंदर्भात रविवारी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
बातम्या आणखी आहेत...