आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकाचा डोळा लागला अन् ट्रक दोन पुलांतील पोकळीत घुसला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रात्रभर ट्रक चालणाऱ्या चालकाचा डोळा लागताच ट्रक पुलाच्या कठड्याला धडकल्याची घटना रविवारी पहाटे चार वाजता बीड बायपासवरील बाळापूर फाट्याजवळ घडली. या अपघातात पोटात स्टिअरिंग घुसून चालक गंभीर तर क्लीनरसह एक सहकारीही जखमी झाला. अपघाताची माहिती पोलिसांना मिळण्यास वेळ लागल्याने ब्रेक खाली फसलेले पाय पोटात घुसलेल्या स्टिअरिंगसह चालक जवळपास दोन तास मृत्यूशी झुंज देत होता. त्याच्यावर घाटीत उपचार केले जात आहेत. चालक अनिल हरी हराडे (२०, रा. बलसूर, ता.उमरगा) आणि इस्माईल दांडगे (रा. लातूर) अशी जखमींची नावे आहेत.

शनिवारी अनिल ट्रकने (एमएच २५ यू २४८७) बीडहून पुण्याकडे मैदा घेऊन जात होता. बीड बायपासमार्गे पुण्याकडे जात असताना अनिलचा डोळा लागला आणि ट्रकवरील नियंत्रण सुटले. बाळापूर फाट्याजवळील दोन पुलांमध्ये असलेल्या पोकळीत ट्रक अडकला. ट्रकची समोरील बाजू खालच्या दिशेने झाली. जोराच्या धडकेने ट्रकच्या समोरील भगाचा चुराडा झाला. त्यात अनिलशेजारी बसलेला इस्माईल अन्य एक किरकोळ जखमी झाले. परंतु चेपलेल्या भागात अडकलेल्या अनिलच्या पोटात स्टिअरिंग घुसली, तर कमरेपासून खालचा भागही केबिनमध्ये अडकला. माहिती मिळताच एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक सीताराम केदारे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अनिलला काढण्यासाठी तासाभराने अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. दोन तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अनिलला बाहेर काढून घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
 
क्रेननेवर केली केबिन, कटरने स्टिअरिंग कापली : पोलिसांनी माहिती देताच अग्निशमन विभागाचे अधिकारी डी. बी. साळुंके, अब्दुल अजीज, एल.पी. कोल्हे, सुभाष दुधे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकची बाजू खाली वाकल्याने अनिल बाहेर काढणे अशक्य होत होते. दोन पुलांच्या मधोमध ट्रक अडकल्याने आधी दोन क्रेन बोलावून एका क्रेनने ट्रकची केबिन उचलली. अग्निशमन अधिकाऱ्यांनी कटरने अनिलच्या बाजूचा दरवाजा, बोनेट कापले.
बातम्या आणखी आहेत...