आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास गेटसमोर उभ्या चार दुचाकी जाळल्या, पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिन्सी परिसरातील खास गेटसमोर उभ्या असलेल्या चार दुचाकी माथेफिरूने मंगळवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान पेटवून दिल्या. हा प्रकार समोर येईपर्यंत दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. परंतु स्थानिकांनी धाव घेताच पेटवून देणाऱ्यांनी अंधारात धूम ठोकली होती. विशेष म्हणजे येथून जिन्सी पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. 

जिन्सी परिसरात मध्यरात्रीपर्यंत नेहमी वर्दळ असते. तरीही हा प्रकार घडला. खास गेट परिसरातील एका नाल्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे दुचाकी पुढे नेता येत नसल्याने दुचाकी मालकांनी खास गेट येथील एका टपरीसमोरच नेहमीप्रमाणे चार दुचाकी उभ्या केल्या होत्या. मंगळवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान तीन ते चार माथेफिरूंनी चारही दुचाकी पेटवून दिल्या. 

जवळच राहणाऱ्या काही नागरिकांना जळाल्याचा वास येऊ लागल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता दुचाकी जळत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच ते बाहेर येत असताना अंधारात काही तरुण पळून जाताना दिसले. दुचाकी जळालेल्यांमध्ये राशेद खान (एमएच २० बीसी २५९४), सय्यद मकसूद अली यांच्या (एमएच २० बीएस ६६४४), (एमएच २० सीएफ ६६४४), तर मोहंमद अय्युब (एमएच २६ क्यू ४३२७) यांच्या घटनेमध्ये दुचाकी जळून खाक झाल्या. पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

महिनाभरापूर्वीच संपला होता दुचाकीचा विमा : घटनेमध्येराशेद खान यांची बजाज कंपनीची पल्सर २२० दुचाकी जळाली. महिनाभरापूर्वीच त्यांच्या या दुचाकीचा विमा संपला होता. पैशांची जमवाजमव झाल्यावर खान लगेच विमा काढणार होते. परंतु त्यापूर्वीच ही घटना घडल्याने मोठे संकट उभे राहिले. 

मे महिन्यानंतर टोळी सक्रिय...
जानेवारी ते मे महिन्यापर्यंत शहरात दुचाकी जाळण्याचे सत्र सुरू होते. १९ मे रोजी भावसिंगपुऱ्यातील नवयुग कॉलनीत दुचाकी जाळली होती. त्यापूर्वी मे रोजी नारेगाव परिसरातील माणिकनगर, १५ फेब्रुवारी रोजी संजयनगर येथे रिक्षा, तर १२ फेब्रुवारी रोजी औरंगपुरा येथील दुचाकी जाळली होती. त्यापूर्वी २०१६ मध्ये मोठे जळीत सत्र सुरू झाले होते. वाळूज जयभवानीनगरमध्ये जॉन तिर्थे गँग हे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून आरोप सिद्ध झाल्याने पोलिसांनी तिर्थेवर मोक्काअंतर्गत कारवाई करत जेरबंद केले. 

औरंगपुऱ्यातील कार जळीत प्रकरणाचा तपास अद्याप लागेना...
१४फेब्रुवारी रोजी औरंगपुऱ्यातील वाहनतळावर उभ्या चार कार मध्यरात्री अशाच माथेफिरूंनी जाळल्या होत्या. त्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्तांनी पथकाची नियुक्ती करून तपास वेगाने करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु सहा महिने उलटूनही अद्याप या प्रकरणातील आरोपी शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...