आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीची धडक; बहीण,भावाचा अंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भरधाव दुचाकीने धडक दिल्याने महिला, मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री जालना रोडवरील एसएफएस शाळेसमोर घडला. वर्षा निरंजन नवले (३५) त्यांचा मामेभाऊ रोहन राधाकिसन शिंदे (७) अशी मृतांची नावे आहेत. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली.

वर्षा आणि रोहन हे दोघेही रविवारी एसएफएस शाळेच्या मैदानावरील प्रदर्शनात गेले होते. रात्री दहाच्या सुमारास घरी परतण्यासाठी ते रस्ता ओलांडून जात असताना श्याम शिवलाल दराडे (२०, रा. मुकुंदवाडी) याने सुसाट वेगाने दुचाकी (एमएच २० डीजी ९४६७) दामटली. यात वर्षा त्यांची मुलगी सई वंदना त्यांचा मुलगा रोहन यांना जोराची धडक बसली. धडक इतकी जोरात होती की दुचाकीचालक चौघेजण दुभाजकावर आदळले. एका सुजाण नागरिकाने वर्षा रोहनला त्याच्या कारमध्ये नेत असताना रोहनचा वाटेतच मृत्यू झाला. श्यामला घाटीत वर्षा यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वर्षा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना घाटीत दाखल केले. रात्री ११.३० च्या सुमारास वर्षा यांची प्राणज्योत मालवली. सई आणि वंदना यांच्यावर उपचार सुरू आहेत. तुषार रावसाहेब भोसले (३९,रा. मुकुंदवाडी) यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून श्यामविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
त्या मेस चालवायच्या
वर्षाया गेल्या अनेक वर्षांपासून सेव्हनहिल्स उड्डाणपुलाच्या जवळ मेस चालवत होत्या. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे पती बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करतात. त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
पुढे वाचा...
> लाखासाठी विवाहितेचा छळ
बातम्या आणखी आहेत...