आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौक्याजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरापासून जवळच असलेल्या चौका घाटाजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजता घडली. रावसाहेब त्र्यंबक घुगे (५०, रा. कणखोरा) अपघातात मृत पावले.

रावसाहेब औरंगाबादहून चौक्याकडे जात होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीस्वार ट्रकमध्ये अडकला होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी दीड तास लागला. त्यानंतर त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घाटीत नेण्यात आला. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

रावसाहेब गेल्या २० वर्षांपासून दूध विक्रीचा व्यवसाय करत होते. बुधवारी दूध वाटून घरी परत जाताना ही घटना घडली. अपघातानंतर ट्रकचालकाने पळ काढला. रावसाहेब यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, सुना-नातवंडे असा परिवार आहे. या अपघाताची फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून जमादार समद शेख तपास करत आहेत.